उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृशोक

उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांना पितृशोक
शिरोळ: एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे चेअरमन उद्योगपती आण्णासाहेब चकोते यांचे वडील बाळासो गणपती चकोते यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
प्राथमिक शिक्षक म्हणून 36 वर्षे सेवा करून ते सेवानिवृत्त झाले होते.अत्यंत मितभाषी, मायाळू व मनमिळावू स्वभावामुळे ते आप्पाजी या नावाने सर्वत्र परिचीत होते. शेवटपर्यंत त्यांनी शेती व शिक्षण क्षेत्राला स्वतःला वाहून घेतले होते , कै गणपती आण्णा चकोते चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी चकोते इंग्लिश स्कूल अत्यंत उत्कृष्टरित्या, नावारूपाला आणले .चकोते स्कूलचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. शाळेतील लहान मुलांमध्ये ते दिवसभर रमून जात असत, सर्व विद्यार्थ्यांमध्ये ते आप्पाजी म्हणूनच ओळखले जात होते.त्यांच्या दुखद निधनामुळे चकोते परिवार, चकोते उद्योग समूह व नांदणी परिसरात शोक पसरला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना ,मुलगी, जावई,नातवंडे असा परिवार आहे.गुरुवार दि 15/10/2026 रोजी पंचगंगा नदीघाट, नांदणी येथे सकाळी 10 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.



