17 सप्टेंबर रोजी वेरूळ येथे विश्वकर्मा वंशीय समाजाचा महामेळावा
महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

17 सप्टेंबर रोजी वेरूळ येथे विश्वकर्मा वंशीय समाजाचा महामेळावा , उद्योग शिबीर महाराष्ट्रातील सर्व समाज बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र वेरूळ (तालुका खुलताबाद, जिल्हा छ. संभाजीनगर) येथे प्रभू विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त विश्वकर्मा सुतार, लोहार, सोनार, तांबट, पाथरवट समाज बांधवांचा मेळावा, भव्य रोजगार, उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मिरवणूक, उद्घाटन, रोजगार मेळावा, उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, विविध शासकीय योजनांची माहिती, लघुउद्योजकांचे प्रदर्शन, स्टॉल्स व विक्री, पुरस्कार वितरण व समारोप असा दिवसभर कार्यक्रम होणार आहे. खादी ग्राम उद्योग, जिल्हा उद्योग केंद्र, एम. एस. एम. इ., जिल्हा कौशल्य विभाग, आर्थिक विकास महामंडळ यांचे अधिकारी स्वतः उपस्थित राहणार आहेत. पीएम विश्वकर्मा योजना व बांधकाम कारागीर योजना बद्दलही वेरूळ येथे माहिती देण्यात येणार आहे. तसेच सी. एम. इ. जी. पी., पी. एम. ई. जी. पी. (CMEGP, PMEGP) मधून उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
श्री क्षेत्र वेरूळ येथील विश्वकर्मा मंदिर (कन्नड रोड, वेरूळ, ता. खुलताबाद, जिल्हा छ. संभाजीनगर) येथे होणाऱ्या या मेळाव्यास बेरोजगार तरुण, व्यावसायिक, लघु उद्योजक, व्यापारी व महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच विश्वकर्मा वंशीय समाज बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या उद्योग व व्यवसाय तसेच उत्पादनांचे प्रदर्शन करावे. त्या निमित्ताने आपल्या उद्योगाला व व्यवसायाला नवीन ग्राहक बाजारपेठ आणि संधी मिळवून देण्यासाठी हा मेळावा एक उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. आपल्या उद्योगाच्या प्रदर्शनासाठी नाममात्र दरामध्ये स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ज्या उद्योजक, व्यापारी बांधवांना किंवा महिला बचत गटांना स्टॉल बुक करायचे आहेत त्यांनी अधिक माहितीसाठी गोपाल राऊत (97 64 72 27 42), आंबट सर (9823230478), केशव सपकाळ (8329302328) यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेळाव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहे. तरी समस्त विश्वकर्मीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने विश्वकर्मा पूजन दिन, रोजगार मेळावा कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी केले आहे.
सदर कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष सचिन सुतार, राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर, सरचिटणीस संजय सुतार, राज्य सचिव विलास पवार, राज्य उपाध्यक्ष राजेश नागपुरे, गोपाल राऊत, धनराज वेलणकर, केशव सपकाळ, जिल्हा शहर अध्यक्ष अमोल डोळस, शहर कार्याध्यक्ष किशोर सिरसाठ, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत, परमेश्वर पांचाळ, बालाजी पांचाळ, प्रवक्ते भाऊसाहेब राऊत, राज्य संघटक राजकुमार राऊत, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांच्यासह राज्य, विभाग, जिल्हा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.




