आपला जिल्हाताज्या घडामोडी

कुळस्वामिनी श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई आईसाहेबांची “श्री भीमादेवी ” अलंकृत पूजा.

मंगळवार, दिनांक : १३ ऑक्टोबर २०२६  शारदीय नवरात्रौत्सव : तिसरी माळ 

कुळस्वामिनी श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई आईसाहेबांची “श्री भीमादेवी ” अलंकृत पूजा.

एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

आज 13 ऑक्टोबर 2026 शारदीय नवरात्र महोत्सव श्री शके 1948 ची तृतीया तिथी नवरात्र महोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई दुर्गा सप्तशतीच्या अकराव्या अध्यायात जगदंबेने सांगितलेल्या आपल्या भीमादेवी नावाच्या रूपात नटली आहे. 

भक्तांच्या रक्षणासाठी मारणारी देवी तर अनेक रूपात आपण पाहतो पण कृषीमुनींच्या रक्षणासाठी चक्क असुरांनाच खाऊन टाकणारी जगदंबा म्हणजे भीमादेवी भीम याचा अर्थ उग्ररूप देवीने हा अवतार हिमाचलक्षेत्रामध्ये धारण केला ज्या वेळेला दैत्यांनी ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊ जगदंब उग्ररूपात प्रगट झाली. हातामध्ये चंद्रहास नावाचे खड्ग डमरू पानपात्र आणि असुराचे मस्तक धारण करणारी ही देवी नीलवर्णा अशी आहे. तिच्या सुळे दाढा बाहेर आलेल्या असून तिच्या मोठ्या डोळ्यांची शत्रूंना भीती वाटते. 

अशीही भीमादेवी कालरात्री एकवीरा अशा नावांनी प्रसिद्ध असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून तिची प्रसिद्धी आहे.अशी ही कामदा सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??