आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

इंग्रजी विषयात तन्वी शिरोळेचे विद्यापीठात अव्वल यश ८६.१४ टक्के गुणांसह दोन मानाची पारितोषिके 

‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण

इंग्रजी विषयात तन्वी शिरोळेचे विद्यापीठात अव्वल यश ८६.१४ टक्के गुणांसह दोन मानाची पारितोषिके 

‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण

मिरज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क 

येथील लोकनेते प्रा. शरद पाटील महाविद्यालयातील बी.ए. भाग-३ इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी कु. तन्वी श्रीकांत शिरोळे हिने शिवाजी विद्यापीठाच्या मार्च/एप्रिल २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. इंग्रजी विषयात तब्बल ८६.१४ टक्के गुणांसह सर्वोच्च गुण मिळवत तिने प्रो. आर. सदाशिव अय्यर पारितोषिक आणि वासुदेव दत्तात्रय वायंगणकर पारितोषिक अशी दोन मानाची पारितोषिके पटकावली.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी विविध विषयांमध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पारितोषिके प्रदान केली जातात. मार्च/एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल तन्वी शिरोळे हिची या दोन्ही पुरस्कारांसाठी निवड झाली.

तन्वी शिरोळे ही शिपूर येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनी आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत तिने महाविद्यालयीन शिक्षण ‘कमवा आणि शिका’ योजनेतून पूर्ण केले. शिक्षणासोबत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.

उच्च शिक्षणाचीही तिची वाटचाल सुरू असून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे एम.ए. इंग्रजी अभ्यासक्रमासाठी तिला ‘कमवा आणि शिका’ योजनेतून प्रवेश मिळाला आहे.

तन्वीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. सरोज रायनाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. गायकवाड तसेच इंग्रजी विभागातील सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??