आपला जिल्हाताज्या घडामोडी

प्रा. डॉ. पारिसा भोकरे यांना ‘गोवा गौरव’ पुरस्कार जाहीर.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला वितरण

प्रा. डॉ. पारिसा भोकरे यांना ‘गोवा गौरव’ पुरस्कार जाहीर. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला वितरण

​सांगली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

देशभरातील दिव्यांग बांधवांसाठी अखंडपणे कार्यरत असलेल्या हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने नवव्या राष्ट्रीय गोमंतक ‘गोवा गौरव’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकारिता, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार प्रा. डॉ. पारिसा बापू भोकरे (भोसेकर) यांना यंदाचा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

​महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून येत्या २ ऑक्टोबर रोजी गोव्यातील समर्थ गड (मडगाव) येथे सकाळी १० वाजता हा भव्य दिव्य राष्ट्रीय महामहोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद यशो नाईक यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे व कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत रत्नपारखी यांनी दिली.

​या राष्ट्रीय अधिवेशनाला आणि पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांच्यासह जयेश नाईक, सुरेश नांदिवडेकर, अमरदीप अदगे, सुशांत शिवदास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग प्रतिनिधी या महामहोत्सवात सहभागी होणार आहेत.

​प्रा. डॉ. पारिसा भोकरे यांनी आपल्या निर्भीड लेखणीतून नेहमीच सामान्यांचे, उपेक्षितांचे आणि वंचितांचे प्रश्न शासनदरबारी पोटतिडकीने मांडले आहेत. पत्रकारितेसोबतच शैक्षणिक आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य उभे केले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन संस्थेने त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.

​दरम्यान, प्रा. डॉ. भोकरे यांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सांगली, मिरज परिसरासह पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे जोरदार स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. गोव्यात होणाऱ्या या देशव्यापी दिव्यांग महामहोत्सवाला नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांगली जिल्हा दिव्यांग नेते तथा भारती हॉस्पिटलचे समन्वयक केदारी माने यांनी केले आहे.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??