आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्कूल चले हम’ अन् ‘शाळा तेथे वाचनालय’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; २३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूरसह धुळे, सांगली, सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन 

‘स्कूल चले हम ’ अन् ‘शाळा तेथे वाचनालय’ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; २३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोल्हापूरसह धुळे, सांगली, सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन 

कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असावे, या उद्देशाने शिवशाही फाउंडेशन भारतच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्कूल चले हम’ आणि ‘शाळा तेथे वाचनालय’ अभियानाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि नंदुरबार जिल्ह्यांतील सुमारे २ हजार ३५० विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील ५०१ आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील लोंघे, किरवे, मणदूर, तिरंगी आणि वेतवडे येथील शाळांमध्येही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

‘शाळा तेथे वाचनालय’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. याअंतर्गत शाळांना छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यासह क्रांतिकारक, समाजसुधारक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांवरील पुस्तकांचे संच देण्यात आले. विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य आणि खाऊचेही वाटप करण्यात आले.

शिवशाही फाउंडेशन भारतच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील आदिवासी, झोपडपट्टी, डोंगराळ आणि दुर्गम भागातील सुमारे ३ हजार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मोफत शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम राबविला जातो. यंदा २६ जून ते १५ ऑगस्टदरम्यान ‘स्कूल चले हम’ अभियान सुरू असून, त्याअंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये उपक्रम राबविले जात आहेत.या कार्यक्रमास शिवशाही फाउंडेशन भारतचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर अध्यक्षस्थानी होते. प्रदेशाध्यक्ष डॉ. सुहास सपाटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रंजन गावीत, ऋषिकेश पाटील, सचिव प्रतिक कोडूलकर, ऋतुराज पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव जानकर यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, वाचनाची सवय आणि स्पर्धात्मक युगात ज्ञानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

विविध शाळांचे मुख्याध्यापक राहुल मोपले, सौ. विद्या जाधव, सौ. रंजना मुंढे, क्रांतीसिंह सावंत, प्रकाश बारटक्के यांच्यासह शिक्षकवृंद या उपक्रमात सहभागी झाले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.या अभियानासाठी महाराष्ट्राचे युवा नेते अनुप दादा मोरे, आयपीएस श्रीकांत धिवरे, आयआरएस विजयसिंह, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, डॉ. विशाल वळवी, डॉ. मूलचंद सिंह, सुनील करांडे, आशिष गुप्ता आणि राजेंद्र शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक शाळेत वाचनालय असावे आणि विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक असावे, या संकल्पनेतून ‘स्कूल चले हम’ आणि ‘शाळा तेथे वाचनालय’ अभियान महाराष्ट्रातील विविध भागांत पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे शिवशाही फाउंडेशन भारतच्या वतीने सांगण्यात आले.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??