आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संजीवनचा अमेरिकेच्या ‘गॅरी’ संस्थेशी सामंजस्य करार

संजीवनचा अमेरिकेच्या ‘गॅरी’ संस्थेशी सामंजस्य करार

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सने अमेरिकेतील ऑस्टिन, टेक्सास येथील ‘ग्लोबल असोसिएशन फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन’ (गॅरी) या नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा करार संजीवनचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल आयरे आणि गॅरीचे अध्यक्ष डॉ. जिमोह ब्रायमो यांच्यात अधिकृतपणे स्वाक्षरीने करण्यात आला. डॉ. अतुल आयरे यांची गॅरी संस्थेच्या रिसर्च मेंटॉरशिप अँड पब्लिकेशन फेलोशिप २०२६ अंतर्गत रिसर्च मेंटॉर म्हणून झालेली निवड आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक योगदान या करारासाठी अत्यंत मोलाचे ठरले आहे.

या करारावेळी संजीवनचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, प्राचार्य डॉ. संजीव जैन आणि रजिस्ट्रार दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारामुळे संजीवन मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गासाठी जागतिक संधींची कवाडे उघडी झाली आहेत. या कराराच्या माध्यमातून जागतिक परिषदा, कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फरन्स, वेबिनार, सेमिनार तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे उच्च दर्जाचे संशोधन निबंध, पुस्तके, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्ज आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन प्रसिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. 

संजीवन ग्रुप आता गॅरी, ऑस्टिन, टेक्सासच्या ग्लोबल पोर्टलवर नोंदणीकृत संस्था म्हणून समाविष्ट झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधक समुदाय आणि उद्योजकांशी थेट संवाद साधता येईल. तसेच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांमध्ये भाग घेण्याची तसेच नवीन पेटंट व जागतिक उद्योजकतेत रूपांतर करण्याची संधी मिळेल. या जागतिक नेटवर्किंगचा फायदा केवळ संजीवनच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांना नक्कीच होईल असा विश्वास यावेळी डॉ. पी. आर. भोसले यांनी व्यक्त केला.

 

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??