आपला जिल्हाकृषी व व्यापारताज्या घडामोडी

गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा प्रारंभ

महिला सक्षमीकरणासाठी ‘भागीरथी’ ठरतेय आधारवड : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार 

गडहिंग्लजमध्ये भागीरथी मल्टीस्टेटच्या पहिल्या शाखेचा प्रारंभ

महिला सक्षमीकरणासाठी ‘भागीरथी’ ठरतेय आधारवड : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार 

​गडहिंग्लज :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

भागीरथी संस्थेने आजवर हजारो महिलांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा दिली असून, सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांना भक्कम आर्थिक पाठबळ मिळाले की संपूर्ण कुटुंब आणि समाज अधिक समृद्ध बनतो. महिलांनी स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहावे यासाठी अशा पतसंस्था दीपस्तंभासारखे कार्य करत आहेत, असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

​येथील भागीरथी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आबिटकर बोलत होते.

​पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले, की ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना खाजगी सावकारीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अशा विश्वासू सहकारी संस्थांची मोठी गरज आहे. भागीरथी संस्था भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात आपले सामाजिक आणि आर्थिक कार्य पुढे नेईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते संस्थेच्या नूतन सभासदांना अधिकृत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

​खासदार धनंजय महाडिक यांनी संस्थेच्या वीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा पट मांडला. ते म्हणाले, की दोन दशकांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतरित झाले असून तब्बल चाळीस हजारांहून अधिक महिला या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा आणि स्वयंरोजगार या प्रत्येक क्षेत्रात भागीरथीने महिलांना आत्मनिर्भर केले आहे. गडहिंग्लजमध्ये ही शाखा सुरू झाल्याने सीमाभागातील महिलांना सुलभ कर्जसुविधा, मार्गदर्शन आणि सुरक्षित आर्थिक सेवांचा लाभ थेट मिळणार आहे.

​प्रारंभी, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेमागील ध्येय आणि पार्श्वभूमी स्पष्ट केली. अरुंधती महाडिक यांच्या दूरदृष्टीतून आणि सातत्यपूर्ण परिश्रमांतून महिलांच्या सर्वांगीण विकासाचे विविध उपक्रम यशस्वीपणे तळागाळापर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनीही आपल्या भावना व्यक्त करत संस्थेमुळे आपले आर्थिक भविष्य सुरक्षित व सक्षम झाल्याची कृतज्ञता व्यक्त केली.

​या सोहळ्यास माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, वैष्णवी महाडिक, प्रकाशराव चव्हाण, किसनराव कुराडे, रमेश रिंगणे, बिना कुराडे, राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, वंदना खोत, सारिका बटकडली, नागेश चौगुले, शिवाजी मगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??