आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जलदूत रीटा रॉड्रीग्युस यांच्या”पुनर्जीवित नदी – बद्दह”  या पाचव्या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

जलसंवर्धनाच्या प्रेरणादायी कार्याची कहाणी पुस्तकातून जगासमोर

जलदूत रीटा रॉड्रीग्युस यांच्या “पुनर्जीवित नदी – बद्दह ” या पाचव्या पुस्तकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

जलसंवर्धनाच्या प्रेरणादायी कार्याची कहाणी पुस्तकातून जगासमोर.

इचलकरंजी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ज्येष्ठ शिक्षिका तथा जलदूत रीटा रॉड्रीग्युस यांच्या”पुनर्जीवित नदी – बद्दह ‘या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्ली येथे आयोजित तीन दिवसीय ‘प्रकृती-संस्कृती विचार मंथन’ भू-सांस्कृतिक कार्यशाळेत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तरुण भारत संघाचे अध्यक्ष तथा भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, उपाध्यक्ष डॉ. इंदिरा खुराणा, सर्वोच्च न्यायालयातील वकील शेंबंग, अनिता चौहान, जोशमती चॅटर्जी यांच्यासह चंबळ खोऱ्यातील नदी पुनरुज्जीवनासाठी अहोरात्र श्रमदान करणाऱ्या पाणीदार महिला विमलादेवी व संपत्तीदेवी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.

तरुण भारत संघ व जलबिरादरी यांच्या वतीने दिल्ली येथील हरिजन सेवक संघ, गांधी आश्रम येथे 11,12,13 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यशाळेत देशातील विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

‘बद्दह’ नदीला लोकसहभागातून पुन्हा जिवंत करून बारमाही वाहती करण्याच्या प्रेरणादायी कार्याची सत्यकथा या पुस्तकातून मांडण्यात आली आहे. जलसंवर्धनासोबतच प्रकृती, संस्कृती आणि पर्यावरणीय संतुलनाचे जतन-संवर्धन केल्याने चंबळ खोऱ्यातील जनजीवनात झालेल्या अद्भुत परिवर्तनाचे चित्रण पुस्तकात करण्यात आले आहे.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह व जलदूत रीटा रॉड्रीग्युस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या हिंदी व मराठी आवृत्तीचे प्रकाशन एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, सोलापूर यांच्या वतीने नुकतेच पुणे येथे करण्यात आले आहे. त्यानंतर रीटा रॉड्रीग्युस व ॲडव्होकेट ग्रेस रॉड्रीग्युस यांनी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला असून, या माध्यमातून ‘बद्दह’ नदी पुनरुज्जीवनाची प्रेरणादायी कहाणी जागतिक वाचकांसमोर येणार आहे.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??