अंतुर्लीत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
'जन आरोग्य' व 'श्री गणेशा आरोग्याचा' अभियानांतर्गत मोफत तपासणी

अंतुर्लीत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जन आरोग्य’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत मोफत तपासणी
गारगोटी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वतीने आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर यांच्या संकल्पनेतून अंतुर्ली (ता. भुदरगड) येथे ‘महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘श्री गणेशा आरोग्याचा अभियान’ अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचा परिसरातील १२८ नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्घाटन भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती बाबा नांदेकर, पंचायत समिती सदस्य श्री. लाड आणि सरपंच रामदास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रास्ताविक सरपंच रामदास देसाई यांनी केले. समुपदेशक जयवंत सावंत यांनी महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभांविषयी माहिती दिली, तर वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाच्या काळजीवर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
शिबिरात एकूण १२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फ्लेबोटोमिस्ट विद्या निकम यांनी ४८ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी केली, तर संतोष वडर आणि त्यांच्या चमूने रुग्णांची नेत्रतपासणी केली. पुढील उपचारांची गरज असलेल्या ४५ रुग्णांना पुढील उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. पद्मासिंह पाटील, भैरव खोराटे, ऐश्वर्या तेली यांच्यासह आरोग्य पथकाने परिश्रम घेतले. डॉ. पल्लवी तारळकर यांच्या विशेष सहकार्यातून राबवलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.




