आपला जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापूर महापालिकेचा अतिक्रमण आणि अनधिकृत फलकांवर मोठा हातोडा ; ताराराणी चौक ते गांधीनगर मार्गावरील साहित्य कायमस्वरूपी जप्त

कोल्हापूर महापालिकेचा अतिक्रमण आणि अनधिकृत फलकांवर मोठा हातोडा ; ताराराणी चौक ते गांधीनगर मार्गावरील साहित्य कायमस्वरूपी जप्त

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ मोकळे करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्रपती ताराराणी चौक ते तावडे हॉटेल आणि पुढे गांधीनगर परिसरापर्यंत धडक मोहीम राबवत पदपथ आणि रस्ते अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.

​या मोहिमेदरम्यान दोन्ही बाजूंच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटलेली दुकाने, जाहिरात फलक आणि साहित्याची कसून तपासणी करण्यात आली. कारवाईत २१ डिजिटल बोर्ड, २५ प्रचारात्मक झेंडे, २७ लोखंडी पाईप, ४ कमान बोर्ड, २ लोखंडी स्टँड, २ जाळी स्टँड, ३ साधे बोर्ड आणि १ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. याशिवाय रस्त्यावर अडथळा ठरणारे २ कॅरेट, २ वजनकाटे, १० फायबर खुर्च्या आणि १ मोठी छत्री जप्त करण्यात आली.

​जप्त केलेले कोणतेही साहित्य संबंधित व्यावसायिक अथवा अतिक्रमणधारकांना परत दिले जाणार नसून, ते कायमस्वरूपी महापालिकेच्या ताब्यात जमा राहील, असा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कारवाईनंतर काही वेळात पुन्हा साहित्य मांडून व्यवसाय थाटणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

​ही कारवाई सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल आणि अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रफुल्ल कांबळे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडली. यामध्ये अतिक्रमण निर्मूलन विभाग, विभागीय कार्यालय क्रमांक ४ चे कर्मचारी आणि उपद्रव शोध पथकाच्या जवानांचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे संबंधित परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली.

​राष्ट्रीय महामार्गालगतचा आणि शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील तावडे हॉटेल ते गांधीनगर हा पट्टा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि हद्दीच्या स्पष्टतेनंतर महापालिकेच्या रडारवर आला आहे. शहरातील अंतर्गत रस्ते व चौक मोकळे ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. व्यावसायिकांनी स्वतःहून पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा दंडात्मक कारवाईसह कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील, असा सक्त इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??