आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

संजीवन पॉलीटेक्निकमध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मेकर लॅब ऑन व्हील्सचे आयोजन

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रमाणपत्राची संधी

संजीवन पॉलीटेक्निकमध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मेकर लॅब ऑन व्हील्सचे आयोजन

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष अनुभव आणि प्रमाणपत्राची संधी

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मधील पॉलीटेक्निक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मेकर लॅब ऑन व्हील्स’ या विशेष उपक्रमाचे २४ ते २९ ऑगस्ट २०२६ या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मेकर लॅब ऑन व्हील्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, नवीन कल्पना, समस्या सोडविण्याची कौशल्ये, टीमवर्क आणि प्रत्यक्ष प्रकल्पाधारित शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पनांचे प्रत्यक्ष नमुने तयार करण्याची आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.

उपक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले यांच्या हस्ते आणि कार्यकारी संचालक डॉ. अतुल आयरे, डिग्री विभागाचे प्राचार्य डॉ. संजीव जैन, पॉलीटेक्निक विभागाचे प्राचार्य प्रा. निशांत थरकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला इन्फोसिसकडून प्रमाणपत्र मिळणार असून त्यांच्या उपयोग त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक कामासाठी होणार आहे. भविष्यातील इंटर्नशिप, प्लेसमेंट, उच्च शिक्षण अशा संधीसाठी या प्रमाणपत्रांचा उपयोग होऊ शकतो.

या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य प्रा. निशांत थरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समन्वयक प्रा. ए. बी. दाईंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, रजिस्ट्रार दीपक पाटील, डॉ. गजानन कोळी, डॉ. अजित काटकर, प्रा. तौफिक मुल्ला, प्रा. शुभम पाटील, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संजीवन संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभले.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??