आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवन येथील स्पर्धेतून भारताला दर्जेदार खेळाडू मिळतील : आमदार डॉ. विनय कोरे

संजीवन येथे सीबीएसई क्लस्टर फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

संजीवन येथील स्पर्धेतून भारताला दर्जेदार खेळाडू मिळतील : आमदार डॉ. विनय कोरे

संजीवन येथे सीबीएसई क्लस्टर फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन; पोदार स्कूल, डीजीए स्कूल नंदुरबार, टिळक पब्लिक स्कूल, नवी मुंबई संघाची विजयी सलामी

​पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

“संजीवन येथे सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेतून देशाला भविष्यात दर्जेदार खेळाडू मिळतील,” असा विश्वास जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला. संजीवन येथे आयोजित ‘सीबीएसई क्लस्टर-९’ फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

​या प्रसंगी पॅरालिम्पिक कमिटीचे सचिव कपिल मिसाळ, विजय साळुंखे, संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, क्रीडा विभागप्रमुख सौरभ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

​या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ९३ संघ दाखल झाले आहेत. सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात पोदार स्कूलने सिग्नेट पब्लिक स्कूल (पुणे) संघाचा ७-० असा एकतर्फी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यानंतर झालेल्या सामन्यात डीजीए स्कूल (नंदुरबार) संघाने प्रतिस्पर्ध्यावर मात केली. तर टिळक पब्लिक स्कूलने (नवी मुंबई) इंदिरा नॅशनल स्कूल (पुणे) संघावर २-१ अशा गोल फरकाने मात करत रोमहर्षक विजय मिळवला. कल्याणी स्कूल (मांजरी) संघाने विद्या मंदिर (मुंबई) संघाचा ८-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

​सायंकाळी या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. सहभागी संघांचे उत्कृष्ट संचलन, नेत्रदीपक आतिशबाजी आणि संजीवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कला-नृत्य आविष्कार अशा उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला. या स्पर्धा संजीवन टर्फ ग्राउंड, तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी आणि कोडोली हायस्कूल अशा तीन मैदानांवर खेळवल्या जात आहेत.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??