आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
संजीवनच्या आदिराज जाधव व विश्वेश देशपांडेची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड

संजीवनच्या आदिराज जाधव व विश्वेश देशपांडेची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड
पन्हाळा : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
संजीवन विद्याविहार शिक्षण समूह संचलित येथील नामांकित निवासी शाळा संजीवन विद्यालयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रशालेचे दोन गुणवंत खेळाडू आदिराज जाधव आणि विश्वेश देशपांडे यांची १५ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली असून ही राष्ट्रीय स्पर्धा बंगळुरू येथे आयोजित करण्यात आली आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय अंतिम निवड चाचणीमधून दोघांनी महाराष्ट्र राज्य संघात आपले स्थान निश्चित केले.
या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक अमित साळोखे, क्रीडा शिक्षक सागर पाटील व जयंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले आणि क्रीडा संचालक सौरभ भोसले यांचे प्रोत्साहन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवन शिक्षण समूहासह संपूर्ण क्रीडा वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.




